मुख्य सरन्यायाधीश NV रमण्णा यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस; देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोर्टाची LIVE सुनावणी

मुख्य सरन्यायाधीश NV रमण्णा यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस; देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोर्टाची LIVE सुनावणी

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोर्टाची सुनावणीची थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. भारताचे मुख्य सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा 26 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. अशातच CJI NV रमण्णा यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजं लाईव्ह केले गेले.
Published by :
Siddhi Naringrekar

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोर्टाची सुनावणीची थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. भारताचे मुख्य सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा 26 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. अशातच CJI NV रमण्णा यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजं लाईव्ह केले गेले.

एन. व्ही. रमण्णा त्यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी देशाच्या पुढील सरन्यायाधीशांसोबत बेंच शेअर करतील. रमण्णा यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी औपचारिक खंडपीठासमोर त्यांचा निरोप समारंभ पार पडेल. आज CJI रमण्णा CJI नियुक्त न्यायमूर्ती UU ललित यांच्यासोबत बेंच शेअर करतील.

एन. व्ही. रमण्णा यांनी 17 फेब्रुवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली होती. त्यांनी देशाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ गेल्यावर्षी म्हणजेच, 24 एप्रिल 2021 रोजी घेतली होती. रमण्णा यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती उदय लळीत 27 ऑगस्ट रोजी देशाचे 49 वे सरन्यायाधीश या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या कम्प्युटर सेलद्वारे जारी करण्यात आलेल्या नोटिशीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, "माननीय सरन्यायाधीशांच्या न्यायालयाची कार्यवाही, म्हणजेच समारंभ खंडपीठ NIC च्या माध्यमातून वेब पोर्टलद्वारे 26 ऑगस्ट 2022 पासून सकाळी 10:30 AM पासून थेट प्रक्षेपित केली जाईल." असे सांगितले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com