ताज्या बातम्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस वादळी ठरणार?; सत्ताधारी आणि विरोधकांची पत्रकार परिषद
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आजचा शेवटचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे. अनेक मुद्द्यांनी हे अधिवेशन गाजलं. आज विविध प्रश्नांवर शेवटच्या दिवशीही अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.
संविधानावरील चर्चेबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज उत्तर देण्याची शक्यता असून त्याचबरोबर या अधिवेशनात किती विधेयके पारित झाली याबाबतही माहिती मिळू शकते.
तसेच आज अधिवेशन संपल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांची पत्रकार परिषद होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक या पत्रकार परिषदेमधून काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.