ताज्या बातम्या
Winter Session 2025 : हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस
हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानपरिषदेत राजकीय वातावरण अक्षरशः तापणार आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानपरिषदेत राजकीय वातावरण अक्षरशः तापणार आहे. विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावातून TET प्रकरणातील न्यायालयीन निर्णय, शिक्षकांवर लादली जाणारी निवडणूक कामे, ढासळलेली महिला सुरक्षा, कोलमडलेली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, वाढतं प्रदूषण, रखडलेली पायाभूत कामे आणि विविध खात्यांतील कथित आर्थिक गैरव्यवहारांवर सरकारला कोंडीत पकडण्यात आलं आहे.
.
या गंभीर आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सभागृहात सविस्तर आणि ठाम उत्तर देणार असून, सरकारची भूमिका काय असेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अभूतपूर्व शाब्दिक संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे
