2000 रुपयांच्या नोटा बदलण्याचा आज शेवटचा दिवस

2000 रुपयांच्या नोटा बदलण्याचा आज शेवटचा दिवस

2000 रुपयांच्या नोटा बदलण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

2000 रुपयांच्या नोटा बदलण्याचा आज शेवटचा दिवस आहे. 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची अंतिम मुदत सात दिवसांनी वाढवून 7 ऑक्टोबर 2023 करण्यात आली असून आज त्याचा शेवटचा दिवस आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे रोजी 2 हजार रुपयांच्या गुलाबी नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली होती. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत परत करण्यासाठी वेळ दिला होता त्यानंतर तो वेळ वाढवण्यात आला होता.

सरकारनं नोटा बदलून घेण्याची मुदत वाढवून दिली होती. त्या मुदतीचा आजचा शेवटचा दिवस.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com