Bachchu Kadu : शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा
Bachchu Kadu : शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चाBachchu Kadu : शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा

Bachchu Kadu : शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा; आज वर्ध्यात दाखल होणार मोर्चा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतमालाच्या हमीभाव, दिव्यांगांना मानधन, मेंढपाळ आणि मच्छिमारांसाठी न्याय्य हक्कांसाठी माजी आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतमालाच्या हमीभाव, दिव्यांगांना मानधन, मेंढपाळ आणि मच्छिमारांसाठी न्याय्य हक्कांसाठी बच्चू कडू यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला.

  • हा मोर्चा अमरावतीवरून नागपूरकडे निघणार असून हा मोर्चा आज वर्धात पोहचणार

  • ळवारी (28 ऑक्टोबर) सकाळी मोर्चा नागपूरकडे रवाना होईल.

Bachchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतमालाच्या हमीभाव, दिव्यांगांना मानधन, मेंढपाळ आणि मच्छिमारांसाठी न्याय्य हक्कांसाठी माजी आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. हा मोर्चा अमरावतीवरून नागपूरकडे निघणार असून हा मोर्चा आज वर्धात पोहचणार, ज्यात शेतकरी नेते अजित नवले, महादेव जानकर आणि राजू शेट्टी सहभागी होणार आहेत.मोर्चाची सुरुवात आज अमरावतीतून होईल आणि रात्रीचा मुक्काम वर्धा येथे असेल, तर मंगळवारी (28 ऑक्टोबर) सकाळी मोर्चा नागपूरकडे रवाना होईल.

कडू यांनी सोमवारी (27 ऑक्टोबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मोर्चासाठी अमरावतीतील विविध भागातून हजारो ट्रॅक्टर येतील. पाच-सात महिन्यांत घेतलेल्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे लाखो शेतकरी, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छिमार आणि शेतमजूर या महाएल्गार सभेसाठी नागपूरला येणार आहेत. मोर्चाची सुरुवात आज अमरावतीतून होईल आणि रात्रीचा मुक्काम वर्धा येथे असेल, तर मंगळवारी (28 ऑक्टोबर) सकाळी मोर्चा नागपूरकडे रवाना होईल.

याआधी मार्च महिन्यात रायगड पायथ्याशी उपोषण करणारे कडू यांनी फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीचा उल्लेख करताना सांगितले की, त्यावेळी आठ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले गेले होते, परंतु तीन-चार महिने उलटले तरी निर्णय काही झाला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचा बैठकीवर विश्वास उरलेला नाही. कडू यांनी स्पष्ट केले की, सरकारकडून लेखी आश्वासन न मिळाल्यास आंदोलन मागे घेतले जाणार नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com