Today's politics is disgusting.... Rohit Pawar expressed his emotional post
Today's politics is disgusting.... Rohit Pawar expressed his emotional post

Rohit Pawar : आजचं राजकारण हे किळसवाणं.... रोहित पवारांनी व्यक्त केली भावनिक पोस्ट

अजित पवार यांच्या निधनानंतर काही दिवसांतच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून राजकीय वर्तुळात टीका-टिप्पणी सुरू झाली.
Published by :
Riddhi Vanne
Published on

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक निधनाने राज्याच्या राजकारणातच नाही, तर पवार कुटुंबातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ त्यांच्या खासगी विमानाचा अपघात झाला आणि या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. हा धक्का पचवण्याआधीच राज्यात राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्यावरून चर्चा रंगू लागल्या आहेत.

अजित पवार यांच्या निधनानंतर काही दिवसांतच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून राजकीय वर्तुळात टीका-टिप्पणी सुरू झाली. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या विधानांमुळे विलिनीकरणाच्या चर्चेला अधिक हवा मिळाली आणि दिवसभर दावे-प्रतिदावे होत राहिले.

या सगळ्या गोंधळात रोहित पवार यांची भावनिक पोस्ट लक्ष वेधून घेणारी ठरली. आजचं राजकारण माणुसकी विसरत चाललं आहे, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. स्वतः दुःखात असतानाही रोहित पवार कार्यकर्त्यांना धीर देताना दिसले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांनी त्यांना आधार दिला. कठीण काळातही माणुसकी जपणं किती महत्त्वाचं आहे, हे त्यांच्या कृतीतून दिसून आलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com