Thackeray Bandhu : गिरणी कामगारांचे उद्या आंदोलन; ठाकरे बंधू आंदोलनात उद्या एकत्र दिसणार?

उद्या गिरणी कामगारांचा मोर्चा आझाद मैदानात उद्या दुपारी 12 वाजता हा मोर्चा होणार असून मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.
Published by :
Riddhi Vanne

Mill workers' Protest Tomorrow : उद्या गिरणी कामगारांचा मोर्चा आझाद मैदानात होणार आहे. 'मुंबईत हक्काचं घर मिळावं' तसंच इतर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणार आहेत. दुपारी 12 वाजता हा मोर्चा होणार असून यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. 'मुंबईत असल्यास मोर्चात सहभागी होईन, अथवा बाळा नांदगावकर मोर्चात सहभागी होतील' असं राज ठाकरे यांनी गिरणी कामगारांच्या संघटनांना सांगितलं होतं, परंतू हा मोर्चा मुंबईमध्ये असल्याने या मोर्चामध्ये ठाकरेबंधू एकत्र दिसणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

हेही वाचा...

Thackeray Bandhu : गिरणी कामगारांचे उद्या आंदोलन; ठाकरे बंधू आंदोलनात उद्या एकत्र दिसणार?
Pune Katraj News : पुण्यात आईने बाळाला घरात कुलूपबंद केले, बाळ चालत खिडकीत आले; VIDEO Viral
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com