पर्यटकांनो, गोव्यात समुद्रकिनारी दारु पिण्यास बंदी;  50 हजारांपर्यंत दंड

पर्यटकांनो, गोव्यात समुद्रकिनारी दारु पिण्यास बंदी; 50 हजारांपर्यंत दंड

गोवा म्हटलं की सागरकिनारी वाळूवर बसून मस्त एन्जॉय आणि बसलेले पर्यटक, पायाला भिडणाऱ्या समुद्रातील लाटा आणि हातात मद्याचा प्याला असे दृश्य सर्वत्र पाहायला मिळते.
Published by :
Siddhi Naringrekar

गोवा म्हटलं की सागरकिनारी वाळूवर बसून मस्त एन्जॉय आणि बसलेले पर्यटक, पायाला भिडणाऱ्या समुद्रातील लाटा आणि हातात मद्याचा प्याला असे दृश्य सर्वत्र पाहायला मिळते. मात्र आता गोव्याला गेलेल्या पर्यटकांना असे दृश्य पाहायला मिळणार नाही आहे. गोव्याच्या सरकारने सागरकिनारी बसून दारू पिण्यास बंदी घातली आहे.

किनाऱ्यावर होणारा दारूच्या बाटल्यांचा कचरा आणि अस्वच्छतेमुळे सरकारने कठोर नियम केले आहेत. यानुसार समुद्रकिनारी बसून दारू पिता येणार नाही. हे नियम मोडल्यास 5 ते 50 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. गोवा सरकारने राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर मद्यपान करण्यास बंदी घातली आहे. गोव्याच्या पर्यटन विभागाने याबाबतचे आदेश लागू केले आहेत. तसेच दलाल, भिकारी आणि समुद्रकिनाऱ्यांवर बेकायदेशीरपणे बेड उभारणे तसेच कर्नाटकातील कारवार आणि महाराष्ट्रातील मालवण येथे समुद्रातील राइड्ससाठी वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटरद्वारे प्रचार करण्यास मनाई केली आहे.

गोवा पर्यटन स्थळ संरक्षण आणि देखभाल कायदा, 2001 च्या कलम 3 अंतर्गत हे निर्देश देण्यात आले आहेत. समुद्रकिनाऱ्यांचे नुकसान आणि पर्यटन स्थळांचे संभाव्य नुकसान किंवा बिघडण्याची शक्यता असल्याने हे बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटन सुव्यवस्थित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. गोव्यात अधिक प्रमाणात पर्यटक आकर्षित व्हावेत, असा या मागचा उद्देश आहे. महाराष्ट्रातील मालवण व कर्नाटकातील कारवारमधील वॉटर स्पोर्ट्सच्या अवैध तिकीट विक्रीकरही गोवा सरकारने बंदी घातली. अनधिकृतपणे तिकीट विक्री करण्याऱ्यांकरही कारवाई केली जाणार आहे. अवैध व्यवसायांमुळे पर्यटन स्थळांची हानी होत असल्याचे सरकारने म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com