Karnataka Sugarcane Farmers Protest : कर्नाटकात पुन्हा ऊस दराचं आंदोलन भडकले; समीर वाडी साखर कारखान्यात ट्रॅक्टर्स पेटवले
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...
(Karnataka Sugarcane Farmers Protest) कर्नाटकात पुन्हा एकदा ऊस दर आंदोलन भडकल्याचे पाहायला मिळत आहे. बागलकोट समीरवाडी साखर कारखान्यात ट्रॅक्टर्स पेटवण्यात आल्याची घटना घडली आहे.
चार तालुक्यांत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. समीरवाडी साखर कारखान्यात ट्रॅक्टर्स पेटवण्याच्या प्रकारानंतर जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून तात्काळ कारवाई करण्यात आली आहे.
हा आदेश कलम 164 अंतर्गत लागू करण्यात आला असून, उपविभागीय अधिकारी संगप्पा यांनी ही कारवाई केली आहे.विजापूर व बेळगाव जिल्ह्यांतून अतिरिक्त पोलीस पथकं मागवण्याची तयारी करण्यात आली असून जमखंडी, रबकवी, बाणहट्टी व मुधोळ तालुक्यांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची तयारी सुरू आहे. या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
