Stock Market Fraud : शेअर मार्केटमधून ट्रेडिंग फ्रॉड, बंगळुरूतून चौघांना अटक

Stock Market Fraud : शेअर मार्केटमधून ट्रेडिंग फ्रॉड, बंगळुरूतून चौघांना अटक

डिजिटल मार्केटिंग कंपनी "व्हॅल्यू लिफ"च्या अधिकाऱ्यांनी सायबर फ्रॉडमध्ये गुंतलेल्या हाँग काँगच्या कंपनीला मदत केल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • शेअर मार्केटमधून ट्रेडिंग फ्रॉड प्रकरणात बंगळुरूतून चौघांना अटक

  • डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या चार उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अटक

  • दिवाळीनिमित्त 4 दिवस शेअर बाजार बंद

डिजिटल मार्केटिंग कंपनी "व्हॅल्यू लिफ"च्या अधिकाऱ्यांनी सायबर फ्रॉडमध्ये गुंतलेल्या हाँग काँगच्या कंपनीला मदत केल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. डिजिटल अरेस्ट प्रकरणानंतर आता ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फ्रॉड विरोधात अशा पद्धतीची पहिलीच कारवाई असल्याचे समजते.

व्हॅल्यू लिफ कंपनीच्या उपाध्यक्ष (सेल्स) आणि अकाउंट्स हेड यांच्यासह एकूण चौघांना अटक करण्यात आली आहे.हाँग काँगच्या फर्स्ट ब्रीज कंपनीने फेसबुकवर जुलै महिन्यात देशात ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फ्रॉडच कॅम्पेग्न चालवलं होत. या कॅम्पेन दरम्यान अर्थ तज्ज्ञांचे डीप फेक व्हिडिओ बनवून अनेकांना शेअर ट्रेडिंग फ्रॉडमध्ये पैसे गुंतवण्यात उद्युक्त करण्यात आलं होतं. यां कॅम्पेनसाठी व्हॅल्यू लिफ कंपनीच्या प्लॅटफॉर्मचा वापर झाल्याचा आरोप आहे. कॅम्पेन दरम्यान व्हॅल्यू लिफची अनेक खाती फेसबुकची पेरेंट कंपनी मेटाने येल्लो फ्लॅग देखील केली होती. मात्र, त्यानंतरही कॅम्पेन सुरूच ठेवल्याचा आरोप कंपनीवर आहे, त्यातूनच बंगरुळू सायबर विभागाने कारवाई करत कंपनीच्या 4 उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या असून अधिक तपास सुरू आहे.

दिवाळीनिमित्त 4 दिवस शेअर बाजार बंद

देशभरात दिवाळीच्या सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे, त्यामुळे दिवाळीनिमित्ताने भारतीय शेअर बाजार 21 ऑक्टोबरला मंगळवारी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त बंद राहणार आहे. दिवाळी बालिप्रतिपदेच्या निमित्तानं यानंतर 22 ऑक्टोबरला शेअर बाजारात ट्रेडिंग होणार आहे. 25 ऑक्टोबरला शनिवार आणि 26 ऑक्टोबरला रविवार असल्यानं या दिवशी देखील शेअर बाजार बंद राहील. म्हणजेच शेअर बाजार येत्या आठवड्यात केवळ तीन दिवस सुरु राहील. 21 आणि 22 ऑक्टोबरला दिवाळीला मल्टी कमोडिटी एक्सचेंज बंद राहील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com