मुलुंड-ऐरोली मार्गावर वाहतूक कोंडी; ऐरोली मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुलुंड-ऐरोली मार्गावर वाहतूक कोंडी; ऐरोली मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

मध्य रेल्वेवर आजपासून 3 दिवस जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मध्य रेल्वेवर आजपासून 3 दिवस जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी आणि ठाण्यातील फलाटाच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी स्थानकातील फलाटाच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेकडून 36 तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. तर ठाण्यातील फलाटाच्या कामासाठी ब्लॉक 63 तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे.

यात आता मुलुंड-ऐरोली मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. ऐरोली मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मुंबईकर हे आपल्या खाजगी वाहनाने कामाला निघाले आहेत. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com