Local delayed
प्रातिनिधीक फोटो

Central, Harbour Local: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक खोळंबली, पश्चिम रेल्वेही उशिराने

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पश्चिम रेल्वेही उशिराने धावत आहे.
Published by :
Published on

आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी लवकरच घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेच्या खोळंब्याचा सामना करावा लागत आहे. तिन्ही मार्गावरील रेल्वे गाड्या 20 ते 25 मिनिटं उशिराने, प्रवाशांचे हाल होत आहेत. आज प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणासाठी कार्यालयात शासकीय कर्मचारी व अन्य कार्यालयीन कर्मचाऱ्यांना वेळेवर पोहचणे अशक्य झाले आहे.

हार्बर मार्गावरील कोणार्क ब्रिजचे काम

हार्बर मार्गावरील कोणार्क ब्रिजचे काम सुरू असल्याने आज हार्बर मार्गावर पहाटे रेल्वे खोळंबली आहे. या कामाबाबत प्रवाशांना कुठलीही पूर्व कल्पना न दिल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे.

सकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी निघणारी रेल्वे ६ वाजता जीटीबी रेल्वे स्थानक पोहचली मात्र जीटीबी ते वडाला दरम्यान वारंवार सिग्नल मिळाल्याने ६ वाजून ६ मिनिटांनी वडाला पोहोचणारी रेल्वे तब्बल ५० मिनिटे उशिरा म्हणजे ६ वाजून ५६ मिनिट उशिरा वडाला रेल्वे स्थानकात पोहचली.

हार्बर मार्गावरील सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व गाड्या वडाळापर्यंत

वडाळा रेल्वे स्थानकावर हार्बर मार्गावरील सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व गाड्या वडाळापर्यंत चालविण्यात येतील अशा सूचना रेल्वेकडून दिल्या गेल्या. ५ वाजून ३० मिनिटांनी हार्बर मार्गावर कोणार्क ब्रिजचे काम सुरू करण्यात आले आहे. ते काम अजूनही पूर्ण न झाल्याने वाहतूक वडाळापर्यंतच सुरू राहील. या सूचनेनंतर आधीच उशिरा झालेल्या रेल्वे प्रवाशांना ध्वजारोहणासाठी कार्यालयात कसे पोहचायचे याची चिंता सतावू लागली आहे. दरम्यान प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. रविवारचा दिवस असल्याने अनेक प्रवाशांनी १० वाजता मेगाब्लॉक सुरू होणार असल्याने कार्यालयात जाण्याऐवजी घरचा मार्ग निवडला आहे.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेकडून विशेष यांत्रिकी अभियान सुरू असल्याकारणाने पालिकेने ब्लॉक घेण्यात आल्याचं मध्य रेल्वे कडून सांगण्यात आलं.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com