Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

हिंदी-मराठी वादावर परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट भूमिका घेत एक महत्त्वपूर्ण उपक्रम जाहीर केला आहे.
Published by :
Team Lokshahi

मिरा-भाईंदरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पसरवण्यात येणाऱ्या हिंदी-मराठी वादावर परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट भूमिका घेत एक महत्त्वपूर्ण उपक्रम जाहीर केला आहे. अमराठी नागरिकांनी सहजतेने मराठी शिकावी यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक शाखेत बाराखडीची पुस्तके ठेवण्यात येणार असून, मराठी शिक्षणाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून कोणावरही जबरदस्ती न करता प्रेमाने मराठी शिकवण्यात येईल. याचपार्श्वभूमिवर प्रताप सरनाईक म्हणाले की, "मी गेल्या चार टर्म मिरा-भाईंदरमधून मराठी आमदार म्हणून निवडून आलो आहे. येथे राहणाऱ्या प्रत्येक भाषेच्या नागरिकांनी मला मत दिले आहे. त्यामुळे माझ्यासाठी सर्व भाषांचा सन्मान महत्त्वाचा आहे".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com