आजपासून त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर आठ दिवसांसाठी बंद

आजपासून त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर आठ दिवसांसाठी बंद

आजपासून त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर आठ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

आजपासून त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर आठ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. 5 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत पूर्णपणे काम बंद राहणार आहे. ज्योतिर्लिंगाचे आणि मंदिराच्या संरक्षण कामांमुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे नेहमीप्रमाणे त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.

शिवलिंगाच्या एका बाजूचा वज्रलेप निघत असल्याचे दिसून येत असून हा वज्रलेप लावून केवळ आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरी देखील शिवलिंगाची झीज होत असल्याची असल्याने मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली होती. यावर उपाययोजना म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते आहे.

मंदिराचे जे काही संवर्धनाचे काम होणार असून ते भारतीय पुरातत्त्व खात्या मार्फत करण्यात येणार आहे, असे देखील मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com