ताज्या बातम्या
Trimbakeshwar Jyotirling Temple: महाशिवरात्रीनिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी
देशात आज महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे.
महेश महाले, नाशिक
देशात आज महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. विविध ठिकाणी महापूजा, महाआरती तसेच अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रात्रीपासूनच रांगा लावल्या आहेत. महाशिवरात्रीनिमित्त त्रंबकेश्वरच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांची सजावट करण्यात आली.
त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून भक्त येतात. हर हर महादेवाचा गजर करत भक्त त्र्यंबक राज्याच्या चरणी लीन होत आहेत.