Tripura Elections : त्रिपुरा विधानसभेसाठी मतदान सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय केलं आवाहन?
Admin

Tripura Elections : त्रिपुरा विधानसभेसाठी मतदान सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय केलं आवाहन?

त्रिपुरा विधानसभेसाठी मतदान सुरू झाले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

त्रिपुरा विधानसभेसाठी मतदान सुरू झाले आहे. या निवडणुकीत 13.53 लाख महिलासह एकूण 28.13 लाख मतदार मतदान करणार आहेत. राज्यातील एकूण 3337 मतदान केंद्रावर हे मतदान केलं जात आहे. यापैकी 1100 मतदान केंद्र संवेदशनशील आणि 28 मतदान केंद्रे अति संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. या निवडणुकीचे निकाल येत्या 2 मार्च रोजी जाहीर होणार आहे.

या निवडणुकीत एकूण 259 उमेदवार उभे राहिले आहेत. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. राज्यातील 60 जागांवर मतदान सुरू झालं आहे. सर्व मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात भाग घेऊन मोठ्या प्रमाणावर मतदान करावं. प्रत्येक व्होट हे सुशासन, विकासाची यात्रा सुरू ठेवण्याच्या दिशेसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. एक समृद्ध आणि भ्रष्टाचार मुक्त त्रिपुरा निर्माण करण्यासाठी हे मत निर्णयाक ठरणार आहे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवाहन केलं आहे की, त्रिपुरातील लोकांनी रेकॉर्ड संख्येने मतदान करावं. लोकशाहीचा उत्सव मजबूत करा. असे आवाहन मोदी यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com