Tuljapur Drugs Case :  Special Report  देवीच्या तुळजापुरात ड्रग्जचा बाजार

Tuljapur Drugs Case : Special Report देवीच्या तुळजापुरात ड्रग्जचा बाजार

तुळजापुर ड्रग्ज प्रकरण: पुजाऱ्यांचा सहभाग, 35 जणांवर गुन्हे दाखल, 21 आरोपी फरार.
Published by :
Team Lokshahi
Published on

तुळजापूर म्हटलं की, प्रत्येकाच्या चेहऱ्यासमोर आई तुळजाभवानीची मूर्ती येते. मात्र आता याच तुळजापूरची नवी ओळख बनू लागली आहे. ती म्हणजे, ड्रग्जचं रॅकेट. या ड्रग्जच्या रॅकेटमध्ये तुळजापुरातील पुजाऱ्यांचाही सहभाग असल्याचे आरोप झाले. त्यावरून मोठी खळबळ उडाली असतानाच, आता याच तुळजापुरात ड्रग्ज प्रकरणावरून आरोपांचा धूर निघू लागला आहे.

तुळजापूरमधील ड्रग्जच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. महत्त्वाचं म्हणजे या रॅकेटमध्ये पुजाऱ्यांचा सहभाग असल्याचेही आरोप झाले. आता या प्रकरणी 35 जणांविरोधात गुन्हे दाखल असून 14 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पण जे 21 आरोपी फरार आहेत, ते सापडत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहतंय. त्याचसोबत तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणामुळे राजकीय आरोपांचा मोठा धूर निघू लागला आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे. म्हणाले की, " त्याचसोबत तुळजापुरातील ड्रग्ज रॅकेटमध्ये पुजाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप झाला. त्यानंतर पुजारी मंडळाने संताप व्यक्त केलं आहे".

तुळाजापूर मंदिराचे पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे. म्हणाले की, "या प्रकरणात भाजपचे कार्यकर्तेही सहभागी असल्याचा आरोप झाल्यावर भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यावरून शिवसेनेच्या नेत्यांनीही चांगलाच टोला लगावला आहे.

विजय गंगणे, भाजप नेते, अमर कदम, शिवसेना यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे. म्हणाले की, "तुळजापूर ड्रग्ज प्रकरण उघड होऊन आता 60 दिवस उलटले आहेत. मात्र अजूनही आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल झालेलं नाही. त्यामुळे पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का? असा सवाल विचारला जातोय. तरीही शक्तीचं ऐलतीर आणि भक्तीचं पैलतीर असलेलं, तुळजाभवानीचं तुळजापूर ड्रग्जमुक्त कधी होणार? हा खरा प्रश्नय आहे".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com