Turkish Airlines Emergency Landing Kolkata Mumbai Airport Plane Collision
Turkish Airlines Emergency Landing Kolkata Mumbai Airport Plane Collision

Turkish Airlines Emergency Landing : काठमांडू-इस्तंबूल विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, कारणही आलं समोर

Turkish Airlines Emergency Landing Kolkata Mumbai Airport Plane Collision : पश्चिम बंगालमधील कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दुपारी मोठी घटना घडली.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Turkish Airlines Emergency Landing Kolkata Mumbai Airport Plane Collision : पश्चिम बंगालमधील कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दुपारी मोठी घटना घडली. काठमांडूहून इस्तंबूलकडे जाणाऱ्या तुर्की एअरलाइन्सच्या विमानाला अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने तातडीने विमान खाली उतरवण्यात आले. या विमानात सुमारे 236 प्रवासी प्रवास करत होते.

उड्डाणादरम्यान पायलटच्या लक्षात उजव्या बाजूच्या इंजिनमधून ठिणग्या उडत असल्याचे आले. धोका लक्षात घेऊन पायलटने कोलकाता हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. परवानगी मिळताच विमानाने सुरक्षितपणे दुपारी 2.49 वाजता कोलकाता विमानतळावर उतरणी केली. सध्या विमानाची सखोल तपासणी सुरू असून, प्रवाशांना विमानतळावरच थांबवण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावरही दोन विमानांच्या पंखांना धक्का बसल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे सलग घडणाऱ्या अशा घटनांमुळे विमान सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

थोडक्यात

  1. पश्चिम बंगालमधील कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी घटना.

  2. तुर्की एअरलाइन्सचे विमान (काठमांडू → इस्तंबूल).

  3. अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाली.

  4. तातडीने विमान कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावर खाली उतरवण्यात आले.

  5. सुमारे 236 प्रवासी विमानात होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com