ट्विटरची नवी पॉलिसी; व्देषपूर्ण आणि बनावट ट्विट करणं पडणार महागात

ट्विटरची नवी पॉलिसी; व्देषपूर्ण आणि बनावट ट्विट करणं पडणार महागात

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी अलिकडेच ट्विटर कंपनी खरेदी केली आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी अलिकडेच ट्विटर कंपनी खरेदी केली आहे. तेव्हापासूनच ट्विटर डील फार चर्चेत आहेत. शिवाय ट्विटरची मालकी मिळाल्यापासून मस्क त्यांनी घेतलेले अनेक मोठे निर्णय जगभरात चर्चेचा विषय राहिले आहेत.नकारात्मक आणि द्वेषपूर्ण ट्विट संदर्भात त्यांनी एक नव्या नियमाची घोषणा केली आहे.

याची माहिती मस्क यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे. मस्कने सांगितले की, आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अजिबात विरोधात नाही, मात्र आता ट्विटरवर नकारात्मक आणि भडकाऊ ट्विट करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. मस्कने आता ट्विटरवर बंदी घातलेली खाती रिस्टोअर करण्याचे कामही सुरू केले आहे. त्यांनी अलीकडेच अमेरिकन कॉमेडियन कॅथी ग्रिफिन आणि प्रोफेसर जॉर्डन पीटरसन यांची खाती रिस्टोअर केली आहेत. ट्विटरने यापूर्वी बंदी किंवा निलंबित केलेले अनेक वादग्रस्त अकाऊंट पुन्हा रिस्टोअर करण्याची योजना करत आहे, दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर अद्याप निर्णय घेणे बाकी आहे.

यासोबतच मस्क म्हणाले की, 'ट्विटरच्या नवीन धोरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु अशा प्रकारच्या ट्विटचे स्वातंत्र्य नाही. नकारात्मक/द्वेषपूर्ण ट्विट जास्तीत जास्त डीबूस्ट केले जातील आणि डिमोनेटाईझ केली जाईल. अशा ट्विट्सना Twitter वर कोणतीही जाहिरात किंवा कमाईचे साधन उपलब्ध असणार नाही.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com