Crime Scene
Crime SceneTeam Lokshahi

अमरावतीच्या मुस्लिम दर्ग्यामध्ये दोघांची हत्या

प्राथमिक पातळीवर पाहता या दोघांचीही हत्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार करून केली असल्याचं समजतं आहे.

सुरज दाहाट | अमरावती: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दडबडशाह बाबा दरगाह येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावतीतीतल बडनेरा पासून केवळ 10 किलोमीटर दूर असलेल्या या दरग्याच्या परिसरात हे मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ माजली आहे.

लोनी गावाजवळ हजरत दडबड शहा बाबा या मुस्लिम दर्ग्यामध्ये एका सेवाधारासह एका युवकाचा मृतदेह आढळला आहे. मुजावर तौसिफ (वय ५०वर्षे) व तौसिफ (वय २५वर्षे) अशी मृतकांची नावं आहेत. दरम्यान, या दोघांचीही हत्या गळ्यावर धारधार शस्त्राने निर्घृणपणे वार करून केली असल्याचं समजतं आहे. दर्ग्याचा सेवादारबअन्वर मुजावर वय५०वर्ष रा. राहणार लालखडी अमरावती व तोफिक वय२५ राहणार कारंजा लाड जिल्हा वाशीम अशी मृतांची नावे आहेत.

 Crime Scene
अमरावतीत आज विदर्भाच्या राजाची विसर्जन मिरवणूक

पोलिस तपास सुरू:

दरम्यान, अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग व जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ हेही या घटनास्थळी पोहोचले आहेत व पोलिसांचं पथक या सर्व प्रकारासंदर्भात तपास करत आहे. घटनास्थळी पोलिसांना शोधकार्यात मदत करण्यासाठी श्वानपथकदेखील दाखल झालं आहे.

Lokshahi
www.lokshahi.com