Tamil Nadu Accident
ताज्या बातम्या
Tamil Nadu Accident : तामिळनाडूत दोन बसचा भीषण अपघात; 11 जणांचा जागीच मृत्यू
तामिळनाडूत दोन बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Tamil Nadu Accident) तामिळनाडूत दोन बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 11 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 30 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तामिळनाडूतल्या कराईकुडी या ठिकाणी दोन बसची टक्कर होऊन हा अपघात झाला. मृतांमध्ये आठ महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने या ठिकाणी बचावकार्य राबवण्यात आलं. या अपघातानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.
Summery
तामिळनाडूत दोन बसचा भीषण अपघात
11 जणांचा जागीच मृत्यू
मृतांमध्ये आठ महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश
