ताज्या बातम्या
Viral Video : भररस्त्यात दोन मद्यधुंद अवस्थेतील मित्रांची फ्री स्टाईल मारामारी; बघ्यांची तोबा गर्दी
व्हायरल व्हिडिओमधून दोन मित्र एकमेकांशी तुफान मारामारी करत असल्याचे दिसून येत आहे.
असं म्हणतात की नवरा-बायकोच्या आणि मित्रामित्रांच्या भांडणात शहाण्या माणसाने पडू नये, ते भांडून पुन्हा कधी एकत्र येतील, काही सांगता येत नाही. असचं काहीस चित्र सध्या एका व्हायरल व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत दोन मित्र एकमेकांशी तुफान मारामारी करत आहेत. लोकांनी त्यांना अडवण्याच्या ऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. दोन मद्यधुंद अवस्थेतील मित्र भररस्त्यात पावसामध्ये एकमेकांना बेदम मारत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कधी चप्पलेनं, तर लाथेनं एकमेकांना आळीपाळीनं मारताना हे दोघे मित्र दिसत आहेत. आजूबाजूला जमलेली गर्दी मात्र त्यांना अडवण्याऐवजी त्यांच्या हाणामारीची मजा घेत असल्याचे दिसून येत आहे.