ताज्या बातम्या
Uttarakhand landslide : उत्तराखंडमध्ये भूस्खलनात दोघांचा मृत्यू; सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
उत्तराखंडमध्ये चामोली जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे.
थोडक्यात
उत्तराखंडमध्ये चामोली जिल्ह्यात जोरदार पाऊस
उत्तराखंडमध्ये भूस्खलनात दोघांचा मृत्यू
सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
(Uttarakhand landslide) उत्तराखंडमध्ये चामोली जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. या मुसळधार झालेल्या पावसामुळे तसेच भूस्खलनामुळे चामोलीपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या नंदनगर क्षेत्रातील चार गावांतील घरांचे मोठे नुकसान झालं असून यामध्ये दोघांचा मृत्यू तर सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
यासोबतच या घटनेत पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळत असून जखमींना हृषीकेश येथील ‘एम्स’ येथे उपचारांसाठी नेण्यात आले आहे. यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.