घाटकोपरमधील इमारत दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा मृत्यू

घाटकोपरमधील इमारत दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा मृत्यू

मुंबईतील घाटकोपरमध्ये इमारत कोसळली.
Published by :
Siddhi Naringrekar

घाटकोपरमधल्या राजावाडी परिसरातील चित्तरंजनगरमध्ये काल सकाळी 9 वाजेच्या सुमारात इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. इमारतीच्या जमिनीचा काही भाग खचल्याने वरच्या तीन मजल्यांनाही तडे गेले. या इमारतीत 4 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. 

दुर्घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना 21 तासांनंतर बाहेर काढण्यात आलं आहे. 21 तास चाललेल्या बचावाकार्यानंतर NDRF च्या टीमने या दोघांना बाहेर काढलं आहे. 

फायर ब्रिगेडचे जवानांनी इमारतीमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यातील दोघांना कालच बाहेर काढण्यात यश आलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com