Uday Samant On Narhari Zirwal: झिरवळांच्या नाराजीवर सामंतांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Uday Samant On Narhari Zirwal: झिरवळांच्या नाराजीवर सामंतांची प्रतिक्रिया, म्हणाले...

नरहरी झिरवळ यांच्या पालकमंत्री पदावरून केलेल्या वक्तव्यावर उदय सामंत यांची प्रतिक्रिया. झिरवळ यांनी गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री दिल्याची खंत व्यक्त केली, तर सामंत यांनी विकासात्मक दृष्टिकोनातून काम करण्याचा सल्ला दिला.
Published by :
Prachi Nate
Published on

पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. या विषयावर बोलण्यासाठी आता हिंगोलीमधून नरहरी झिरवळ हे देखील मागे राहिलेले नाहीत. नपहरी झिरवळ यांनी पालकमंत्री पदावरून मिश्किल वक्तव्य केल्याच पाहायला मिळालं होत. गरीब माणसाला गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री केला आहे असं बोलत नरहरी झिरवाळ यांनी काल एका सत्कार कार्यक्रमांमध्ये जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली. याचपार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रील सर्वात छोटया जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो मी असंच म्हणायचं का? आपण पालकमंत्री म्हणून विकासात्मक जनतेचे देन लागतो, झिरवाळांच्या नाराजीनंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया...

काय म्हणाले उदय सामंत

नरहरी झिरवळ यांनी गरीब असल्याने गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री पद दिलं असल्याची खंत व्यक्त करून दाखवली, यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील वेळेस मी देखील महाराष्ट्रातील सर्वात छोट्या जिल्ह्याचा म्हणजेच सिंधुदुर्गचा पालकमंत्री होतो, मी देखील असेच म्हणायचं का? मात्र आपण पालकमंत्री म्हणून विकासात्मक जनतेच देन लागतो... आणि त्यामुळे ते त्या जिल्ह्यात नाविन्यपूर्ण आणि विकासात्मक काय आहे? ते भाग्य आपल्या नशिबी आलं... असं समजून कामाला सुरुवात करायची, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.

मला लहान जिल्ह्याचे पालकमंत्री केल- नरहरी झिरवळ

मला लहान जिल्ह्याचे पालकमंत्री केल आहे. गरीब माणसाला गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री केला आहे, असं बोलत नरहरी झिरवाळ यांनी काल एका सत्कार कार्यक्रमांमध्ये जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली आहे... त्यानंतर आता मुंबईत गेल्यानंतर या संदर्भात वरिष्ठांची भेट घेणार असल्यास सुद्धा झिरवाळ काल म्हणाले होते... त्यानंतर आज पत्रकारांनी झिरवाळ यांना नाराजी बद्दल विचारले असता, झिरवाळ यांनी सारवा सारव केली असून झिरवाळ आणि नाराजगी याचा काहीही संबंध नाही... अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com