ताज्या बातम्या
Uday Samant : "मविआचे अनेक नेते आमच्या संपर्कात, 90 दिवसांत मोठे पक्षप्रवेश होणार"
महाविकास आघाडीचे अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीचे अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे. उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, काही लोकांना कळून चुकलं आहे की, वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते. त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत. त्यांचा टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे.
आजही मी या मुद्द्यावर ठाम आहे. मी 90 दिवसांमध्ये हे प्रवेश होणार होते असं मी सांगितले होते. दुसऱ्या दिवशी किंवा 24 तासांत हे प्रवेश होतील असं सांगितले नव्हते.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, येत्या 90 दिवसांमध्ये 10 -12 माजी आमदार महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्व स्विकारणार आहेत. त्यावर आजही मी ठाम आहे. अनेक लोकं संपर्कात आहेत. असे उदय सामंत म्हणाले.