Uday Samant : "अन्यथा त्या उमेदवाराचा मी प्रचार करणार नाही" उदय सामंतांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या
राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजत आहे. असं असताना सर्व पक्षाचे नेते त्यांच्या त्यांच्या पक्षातील उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निर्देश देत आहेत. याचपार्श्वभूमिवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीमध्ये बोलताना उमेदवार, पदाधिकारि आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.
उदय सामंत म्हणाले की, "लेकी सुनांवरची वैयक्तिक टीका टाळा.. अन्यथा त्या उमेदवाराचा मी प्रचार करणार नाही.. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शिवानी माने या नगराध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवार असेल अशी शक्यता उदय सामंत यांनी वर्तावली. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या शिवानी माने कन्या आहेत".
"मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवार असेल यामुळे भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा पदाचा राजीनामा घेण्यात येईल... त्यांच्या घरातील मुलगी ती आपल्या घरातील मुलगी समजा..." यावेळी उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरातील प्रचारादरम्यान बोलताना शिवानी माने यांच्यावरती टीका टाळण्याच्या आदेश उमेदवार, कार्यकर्ते, पदाधिकारि यांना दिले आहेत.
