Uday Samantha: गणेश निबे यांची चढती कमान भविष्यामध्ये अशीच उंचावत राहो - उद्योगमंत्री उदय सामंत
महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पुण्यात पार पडला आहे. या कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सांमत आणि विधीमंडळातील राजकीय मंडळींनी उपस्थित लावली होती.
या कार्यक्रमादरम्यान उदय सांमत बोलले की, "कार्यक्रमाचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधीमंडळातील सहकारी महेश लांडगे हे उपस्थित आहेत. ज्यांच्या कार्यक्रमासाठी सर्वजण जमलो आहे, ते सन्माननीय गणेश निबे यांचं व्यासपीठावर सर्वाचे स्वागत करतो".
पुढे उदय सांमत म्हणाले की, "मी निबे यांचं मनापासून राज्याचा उद्योगमंत्री म्हणून शुभेच्छा देतो, आणि त्यांची ही चढती कमान भविष्यामध्ये अशीच उंचावत राहो, ही देखील ईश्वर चरणी प्रार्थना करतो. मी आणि गणेश निबे एकमेकांना दोन वर्षासाठी डिफेन्स एक्सपोच्या निमित्ताने ओळखत होतो. गणेश निबे यांना काही अडचणी होत्या... तेव्हा ते माझ्याकडे आले होते... त्याच्यानंतर मात्र तीन दिवस जो डिफेन्स एक्सपो झाला, त्याची नोंद जागतिक पातळीवर घेतली गेली... त्याच्यानंतर अनेक ठिकाणी उद्योग विभागामध्ये काम करत असताना अनेकवेळा त्यांना सहकार्य करण्याचं भाग्य मला लाभलं. याचं मला मनापासून उद्योगमंत्री म्हणून आनंद आहे की, गणेश निबे सारखा एक मराठी माणूस आज डिफेन्स क्षेत्रामध्ये आपल्या देशाचे नेतृत्त्व करत आहे. तसेच भविष्यामध्ये डिफेन्स क्षेत्रामध्ये तो जगाचे नेतृत्त्व करेल याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही".
नंतर उदय सांमत म्हणाले की, " उद्योग करणाऱ्या व्यक्तीला कमीत- कमी अडचणी याव्या अशी, गणेश निबे यांची सतत भावना असते. तसं त्यांनी माझ्याकडे बोलून दाखवले आहे. मी मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या साक्षीने सांगतो की गणेश निबे यांना उद्योग विभागाकडून जे काही सहकार्य पाहिजे ते एक उद्योगमंत्री म्हणून मदत करेन असा, मी त्यांना शब्द देतो. व्यासपीठावर अजित पवार इथे उपस्थित आहेत. राधाकृष्ण विखे- पाटील साहेब माझी राजकीय कारकिर्द 75 टक्के ही अजित पवारांच्या नेतृत्त्वाखाली गेली आहे. अजित पवारांचे व्यवस्थापनाचे काम चांगले आहे. गणेश निबे तुम्ही निश्चित रहा, तुमची मागील दोन वर्षापुर्वीची शंका दूर केली जाईल."
त्यानंतर सांमत म्हणाले की, "उद्योगकांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही असा, उद्योगमंत्री म्हणून शब्द देतो. महाराष्ट्राच्या उद्योग जगातले गणेश निबे हे मराठी माणूस देशाचे नाव उंचावेल. गणेश निबे यांना पूर्ण ताकद देण्याची जबाबदारी उद्योग विभाग म्हणून आमची सगळ्यांची राहील. तसेच पुन्हा एकदा गणेश निबे यांच्या परिवाराला आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपावतो" असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपले भाषण संपवले.