Udyanraje Bhonsle
Udyanraje BhonsleTeam Lokshahi

नवा लूक साकारत उदयनराजेंनी चालवली 120च्या स्पीडने जिप्सी; पाहा व्हिडिओ

जिप्सीच्या सायलेन्सर मधून जोरदार फायरिंगचा आवाज करत त्यांची ही जिप्सी राईड पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे.
Published by :
Sagar Pradhan

प्रशांत जगताप। सातारा: साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतात. ते कधी काय करतील याचा नेम नाहीये. याच कारणामुळे त्यांचे समर्थक संपूर्ण राज्यभर पाहायला मिळतात.यातच आता पुन्हा चर्चेत आले आहे. उदयनराजे भरधाव वेगाने गाडी चालवणारे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. मात्र, आज खासदार उदयनराजेंचा अंगाचा थरकाप उडवून टाकणारा व्हिडिओ समोर आलाय.

या व्हिडिओमध्ये उदयनराजेराजेंनी चक्क 120च्या स्पीडमध्ये त्यांची आवडती जिप्सी गाडी जलमंदिर निवासस्थानी चालवली आहे. यावेळी त्यांनी डोक्यात गांधी टोपी घालून शेतकरी पोशाख परिधान करून जिप्सी राईड मारली. यादरम्यान त्यांनी गाडीमध्ये पुष्पा सिनेमातील मै झुकेगा नही हा डायलॉग मारला. जिप्सीच्या सायलेन्सर मधून जोरदार फायरिंगचा आवाज करत त्यांची ही जिप्सी राईड पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com