'देवेंद्रजी किती दिवस दुसऱ्यांची ओझी वाहणार?'उद्धव ठाकरे
रंगशारदा सभागृहात शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप अख्खा उभा तरी तरी मला संपवू शकत नाही असं म्हणत जोरदार प्रहार केला आहे.
उध्दव ठाकरे म्हणाले की, देवेंद्रजी किती दिवस दुसऱ्यांची ओझी वाहणार. अजुन किती उपमुख्यमंत्री करणार आहात. आता देवेंद्रजींची दया येते. उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना उपरोधात्मक टोला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत म्हणाले की, “इंडिया, भारत, भारतमाता ही देशाची नावं आहेत. मला मोदी यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही परदेशात जाता, बायडनला मिठी मारता, यांना मिठी मारता, त्यांच्याशी हस्तांदोलन करता. बाजूला उभे राहता, आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या देशाचा पंतप्रधान आहे. पण तेव्हा तुमची ओळख ही प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया अशी केली जाते. तेव्हा तुम्ही देशाचे पंतप्रधान म्हणून जाता की इंडियन मुजाहिद्दीनचे प्रधानसेवक म्हणून जाता?”
मणिपुरमधील झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदी मुस्लिम महिलांकडून राखी बांधून घेतात,पण मणिपुरच्या महिलांकडून राखी बांधून घेण्याची ताकत त्यांच्यात आहे का?