ठाकरेंना पुन्हा धक्का; ठाकरे गटाच्या खासदाराकडून शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र

ठाकरेंना पुन्हा धक्का; ठाकरे गटाच्या खासदाराकडून शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र

निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांना विजय झाला आहे.

निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांना विजय झाला आहे. धनुष्यबाण निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? यावर शिंदे-ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. 17 जानेवारी रोजी निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाकडून युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटाचे दावे फेटाळून लावले होते. यावेळी 23 जानेवारीला दोन्ही गटांना लेखी स्वरुपात उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिला होते. यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धक्का देत धनुष्यबाण व शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले आहे.

हा निर्णय ठाकरे गटाला मोठा धक्का आहे. यासोबतच अजून एक धक्का ठाकरे गटाला बसला आहे. ठाकरे गटातील एका खासदाराने, शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याची माहिती आता मिळत आहे. निवडणूक आयोगाकडे जवळपास २३ लाख कागदपत्रे ठाकरे गटाकडून देण्यात आले होते. नेमका एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारा १४ वा खासदार कोण आहे. अशी चर्चा आता होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com