Uddhav Thackeray MLAs: अनेक ठिकाणाहून ठाकरेंना पदाधिकाऱ्यांचा राम राम! ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश
नवी मुंबई, पालघर, मुरबाड, नाशिक,धुळे, साक्री, परभणी येथील उबाठा गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. ठाण्यातील आनंदआश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न झाला आहे.
उबाठा गटातील नवी मुंबई, पालघर, मुरबाड, धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, परभणी येथील विविध पदाधिकाऱ्यांनी आज ठाण्यातील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्याना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पालघरमधूनही अनेक पदाधिकाऱ्यांचा उबाठा गटाला जय महाराष्ट्र ठोकला आहे.
उबाठा गटाच्या माजी नगराध्यक्षा प्रियांका पाटील, माजी नगरसेविका दीपा पामळे, उबाठा शहरप्रमुख प्रवीण पाटील, माजी नगरसेवक तुषार भानुशाली, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाटील, युवासेना शहर संघटक निमिष पाटील तसेच डहाणूतील आदिवासींच्या प्रश्नांसाठी झटणारे युवा एल्गार संघटनेचे अध्यक्ष विराज गडग यांनी आज पक्षप्रवेश केला. मुरबाड, नाशिक,परभणी, धुळे, साक्री शहरातील पदाधिका-यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला.