Uddhav Thackeray  On Amit Shah
Uddhav Thackeray On Amit ShahUddhav Thackeray On Amit Shah

Uddhav Thackeray : " ॲनाकोंडाला कोंडावाच लागेल"; उद्धव ठाकरेंकडून पुन्हा एकदा भाजपचा ॲनाकोंडा उल्लेख

आज (1 नोव्हेंबर) मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी एल्गार पुकारणार आहेत. आज मुंबईत (Mahavikas Aghadi Mumbai Morcha) महाविकास आघाडी आणि मनसे आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • ही राजकीय पक्षांची एकजुट आहे

  • मतचोरी करणा-यांना उद्धव ठकरेंचा इशारा

  • उद्धव ठकरेंनी अमित शहा यांना पुन्हा डिवचले

  • तुम्ही आमचा पर्दाफास कराच

  • उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना इशारा

Uddhav Thackeray On Amit Shah : आज (1 नोव्हेंबर) मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी एल्गार पुकारणार आहेत. आज मुंबईत (Mahavikas Aghadi Mumbai Morcha) महाविकास आघाडी आणि मनसे आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचं सत्याचा मोर्चा असं नामकरण करण्यात आलंय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray), आदित्य ठाकरे, अमित ठाकरे या मोर्चाला उपस्थित आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाषण केले. त्यांनी पुन्हा एकदा अमित शहांना अॅनाकोंडाला नावाने डिवचलं.

उद्धव ठाकरे म्हणाले की, "संयुक्त महाराष्ट्राच्या बैठकीनंतर पहिल्यांदा राजकीय पक्षांची एकजूट झाली असेल. विरोधी पक्षाची एकजूट नसून लोकशाहीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या लोकांची एकजूट आहे. मतचोरी करणाऱ्या सर्वांनी पाहिलं असेल की, ही फक्त ठिणगी आहे या ठिणगीचा वणवा कधीही होऊ शकतो. तुमच्या बूडाला आग लावण्याची धमग या ठिणगीमध्ये आहे. उद्धव ठकरेंनी अमित शहा यांना पुन्हा डिवचले. या आता अॅनाकोंडाला कोंडावाच लागेल, नाहीतर जागे रहा नाही तर एनाकोंडा येईल आणि गिळंकृत्य करेल. उद्धव ठाकरेंची अमित शहांवर खोचक टीका केली. विरोधी पक्षातील सर्वजण आले पण सत्ताधारी पक्ष आलेले नाही. तुम्ही आमचा पर्दाफास कराच, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना इशारा दिला. मी सर्वांना सांगतोय की, आपण एखादा मतदार यादीत जाऊन चेक करा आपले नाव मतदार यादीत आहे का ते?."

"उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वेरिफिकेशनसाठी ऑनलाईन अर्ज केलाय मात्र बाळासाहेब ठाकरे यांनाच हे माहिती नाही व्हेरिफिकेशन करण्यासाठी निवडणूक आयोगाचे लोक माझ्याकडे आहेत. सक्षम नावाचा ॲप आहे यावर ऑनलाईन अर्ज करण्यात आला होता. माझ्यासकट माझ्या घरातील चारही मतदारांच नाव बाथ करण्याचा प्रयत्न झालाय का हे करावं लागणार आहे. सर्वर ॲप हे सर्व यांच्या हातामध्ये आहे . आम्हाला देखील निवडणुका हवे आहेत. आम्ही तुमच्यासाठी नेतृत्व करत आहोत पक्षभेद विसरून पत्राला आहोत आमच्या डोळ्यात एकच लोकशाहीचा खोल होत आहे. जशी निवडणूक जवळ येत असेल त्यांची दडपशाही सुरू होणार असून हे सगळे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत. आम्ही एकत्र आलोत हे फक्त तुमच्यासाठी एकत्र आला आहोत, आम्ही एकत्र आलो होतो मराठी माणसासाठी आलो होतो हिंदूसाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आले आहोत. पण असं करत असताना तुम्ही भक्कमपणे आमच्या साथ देणं महत्त्वाचं आहे."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com