Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

"EVM" घोटाळा करून भाजप जिंकल्यास देशात असंतोष निर्माण होईल", उद्धव ठाकरेंचा घणाघात

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर तोफ डागली आहे.
Published by :
Team Lokshahi

आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणशिंग फुंकलं आहे. जागावाटपाबाबतचा तिढा सोडवण्यासाठी भाजपने काल शनिवारी १६ राज्यांत आणि २ केंद्रशासित प्रदेशात एकूण १९५ उमेदवारांची यादी घोषित केली. परंतु, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर तोफ डागली आहे. बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याचा आरोप असलेल्या कृपाशंकर सिंह यांना भाजपने उमेदवारी दिलीय. पहिल्या यादीत गडकरींचं नाव नाही, कृपाशंकर सिंह यांचं नाव आहे. ईव्हीएमचा घोटाळा करुन भाजप जिंकलं तर देशात मोठा असंतोष निर्माण होईल, अशी घणाघाती टीका ठाकरे यांनी भाजपवर केलीय.

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. भाजपवर आरोप करत ठाकरे म्हणाले, " आपण जनतेच्या सोबत आहोत. ईव्हीएमच्या माध्यमातून संभ्रंम पसरवला जात आहे. ईव्हीएमचा गैरवापर करून भाजप जिंकलं तर देशात असंतोष निर्माण होईल. बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याचा आरोप कृपा शंकर सिंह यांच्यावर आहे. पहिल्या यादीत नितीन गडकरी यांचं नाव नाही, पण कृपाशंकर सिंह यांचं आहे. तोडा, फोडा, राज्य करा ही भाजपची नीती आहे. ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच भाजपने उमेदवारी दिली आहे. पण आम्ही जनतेच्या सोबत आहोत. आमच्यावर जनतेचा विश्वास आहे."

भाजपने जाहीर केलेल्या या यादीत ३४ केंद्रीय मंत्री, राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वारणसी येथून उमेदवारी लढवणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातच्या गांधीनगरमधून निवडणूक लढवणार असून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लखनऊ येथून निवडणुकीला उभे राहणार आहेत. भाजपने जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी पहिली यादी जाहीर करून लोकसभेच्या निवडणुकीसाठी रणशिंगक फुंकलं आहे. आता या युतीच्या सरकारच्याविरोधात आघाडी सरकार कशाप्रकारे रणनीती आखेल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com