Sanjay Raut : गिरणी कामगारांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut on Mill Workers and Teachers' Protest : आज गिरणी कामगारांचा मोर्चा आझाद मैदानात होणार आहे. 'मुंबईत हक्काचं घर मिळावं' तसंच इतर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणार आहेत. दुपारी 12 वाजता हा मोर्चा होणार असून यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली आहे.
संजय राऊत म्हणाले की, "इतक्या वर्षानंतर सुद्धा होत आले तरी गिरणी कामगारांचे आंदोलन सुरूच आहे, गिरणी कामगारांना घर देण्याच्या नावाखाली त्यांना वांगणीला टाकत आहेत. वागंणी कुठे आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विचारा.
पुढे राऊत म्हणाले की, "माननीय उद्धव ठाकरे यांनी एक प्रस्ताव दिला आहे. या गिरणी कामगारांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भात ज्या जागा तुम्ही अदानी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये गिरणी कामगारांना सुद्धा जागा मिळाव्या ही आमची मागणी असून मुंबईतल्या शिल्लक गिरणी कामगारांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना मुंबईतच प्रस्थापित केले पाहिजे, विस्थापित नाही.
पुढे राऊत म्हणाले की, "धारावी संदर्भात आपण त्यांना टीडीआर दिला आहे धारावीचा इतका मोठा भूखंड दिला आहे. याशिवाय मदर डेअरी पासून दहिसर मुलुंडचे टोलनाके, डम्पिंग ग्राउंड, मिठाग्रह असे अनेक भूखंड त्यांना दिल्यावर हे कोणत्या धन धानग्यांसाठी आहेत. गिरणी कामगार हा मुंबईमधला भूमिपुत्र मराठी माणूस आहे. आमची मागणी एवढीच आहे की, कामगारांना मुंबईच्या बाहेर न टाकता यांना धारावी पुनर्विकास प्रकल्पात सामावून घेतला पाहिजे, यासाठी हा मोर्चा असेल. हा मराठी माणसांचा आवाज असणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मोर्चाला उपस्थित राहतील.
शिक्षकांच्या मुद्द्यावर संजय राऊत म्हणाले की, "शिक्षकांच्या प्रश्न देखील आहे हे सरकार नक्की कोणते प्रश्न सोडवत आहे?. गिरणी कामगारांचा प्रश्न सुटलेला नाही, शिक्षकांच्या प्रश्नासोबतच प्रत्येकाला आश्वासन आणि तोंडाला पान पुसली जात आहे. गिरणी कामगार आणि शिक्षकांच्या आंदोलनाला माननीय शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे.