'...तर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी राजीनामे द्यावेत' उद्धव ठाकरे

'...तर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी राजीनामे द्यावेत' उद्धव ठाकरे

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेमुळे राज्यभरातील वातावरण देखील चांगलेच तापले आहे.
Published by  :
shweta walge

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेमुळे राज्यभरातील वातावरण देखील चांगलेच तापले आहे. यावरूनच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. मराठा आरक्षणाच्या मु्द्यावर ठाकरे सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात वटहुकूम का आणला नाही, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता यावरच उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोतल होते.

ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात वटहुकूम केंद्र सरकार काढते, संसदेला तो अधिकार आहे. देवेंद्र फडणवीस यांचं ज्ञान खूप तोकडं आहे. ते मंत्रालयाच्या आजूबाजूलाही फिरकण्याच्या कुवतीचे नाही. लाठीहल्ल्याचा आदेश सरकारने दिला नाही, असा दावा होत असेल तर याचा अर्थ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही, असेही ठाकरे यांनी म्हटले.

अजित पवार यांना समजूतदार समजत होतो. मी संघनायक होतो, त्यावेळी मी चूकत होतो तर अजित पवार हे विकेटकिपर काय करत होते, असा प्रश्न त्यांनी केला. आता जालनामध्ये जी डोकी फोडलीत त्याचं श्रेय टीमवर्क म्हणून घ्यावं. मी आधी गृहमंत्री यांचा राजीनामा मागत होतो. आता तर, एक फुल दोन हाफ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी दिली. सरकारला विरोध केला तर तो आवाज दडपला जात आहे. बारसूमध्ये ही लाठीचार्ज करण्यात आला. वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. हे सरकार निर्घृण आहे, असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com