'मिशन लोकसभा' निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मैदानात

'मिशन लोकसभा' निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मैदानात

कोकण आणि मराठवाड्यानंतर बुलढाणा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जनसंवाद यात्रा दाखल होतेय. 22 आणि 23 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत.
Published by :
shweta walge

कोकण आणि मराठवाड्यानंतर बुलढाणा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जनसंवाद यात्रा दाखल होतेय. 22 आणि 23 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे एकूण 6 सभा घेणार आहेत. 22 फेब्रुवारीला चिखली,मोताळा, जळगाव जामोद इथे तर 23 फेब्रुवारीला शेगाव, खामगाव,मेहकर या ठिकाणी उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत.. शेगाव इथे गजानन महाराज मंदिरात जाऊन उद्धव ठाकरे दर्शन घेणार आहेत.. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. शिवसेना शिंदे गटात असणारे बुलढाणा मतदारसंघातील विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com