बँका सलग चार दिवस बंद राहण्याची शक्यता; कर्मचारी संघटना आक्रमक

बँका सलग चार दिवस बंद राहण्याची शक्यता; कर्मचारी संघटना आक्रमक

30 आणि 31 जानेवारी बँकांचा संप झाल्यास बँका सलग चार दिवस बंद राहणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

30 आणि 31 जानेवारी बँकांचा संप झाल्यास बँका सलग चार दिवस बंद राहणार आहे. बँक कर्मचारी संघटनांची संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने गुरुवारी त्यांची भूमिका स्पष्ट केली. विविध मागण्यांसाठी संघटनांनी 30 जानेवारी रोजी दोन दिवसांची संपाची हाक दिली आहे.

भारतीय बँक संघाच्या भूमिकेविरोधात पुन्हा आंदोलनचा निर्णय घेण्यात आला आहे. 30 आणि 31 जानेवारी रोजी संपाचे हत्यार उपासण्यात आले आहे. तसेच याच दरम्यान 28 जानेवारी रोजी चौथा शनिवार तर 29 जानेवारी रोजी रविवार असल्याने चार दिवस बँका बंद राहतील.30 आणि 31 जानेवारी रोजी सोमवार आणि मंगळवार येत आहेत. तर त्यापूर्वी 28 जानेवारी रोजी चौथा शनिवार तर 29 जानेवारी रोजी रविवार असल्याने बँका चार दिवस बंद राहतील

युएफबीयूची गुरुवारी मुंबईत बैठक झाली. अनेकदा अर्जफाटे करुनही भारतीय बँक संघाने (IBA) कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे संप करत असल्याचे एआईबीईएचे महासचिव सी. एच. वेंकटचलम यांनी अशी माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com