Ujjwal Nikam: खोट्या आश्वासनांमुळे प्रगती होत नाही, हे दिल्लीच्या जनतेला कळलं, उज्ज्वल निकम
दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल सध्या पाहायला मिळत आहे. असं असताना दिल्लीमध्ये सत्तापालट होताना दिसत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने अनपेक्षितपणे आपचा पराभव करत, मुसंडी मार सत्ता काबिज केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये आता आपचे अरविंद केजरीवाल यांचा 3182 मतांनी परभाव झाल्याची माहिती समोर आली आहे.
याचपार्श्वभूमिवर भाजपचे नेते आणि वकील उज्ज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उज्ज्वल निकम म्हणाले की, तुम्ही खोटी आश्वान देऊन जाहीरणामा काढून हे फुकटमध्ये देऊ, ते फुकटमध्ये देऊ असं करून दिल्लीची प्रगती करता येत नाही... त्यामुळे आनंद या गोष्टीचा आहे की, दिल्लीच्या मतदारांना कळून चुकलं आहे.
त्यामुळे दिल्लीमध्ये भाजपची आघाडी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये आता भाजपचीच सत्ता स्थापन होईल. अरविंद केजरीवाल हे फार हुशार व्यक्तिमत्त्वाचे आहेत पण, त्यांनी जनतेला खोटी आश्वासन दिली जे की चांगल नाही आहे. असं म्हणत उज्ज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.