Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्रात

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्रात

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. यातच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. नांदेडमध्ये आज अमित शाह यांची सभा होणार आहे. नांदेड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नरसी गावात संध्याकाळी ५ वाजता या सभेचं आयोजन करण्यात आले आहे.

या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com