Admin
बातम्या
Jyotiraditya Shinde : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंना कोरोनाची लागण
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंना कोरोनाची लागण झाली आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंना कोरोनाची लागण झाली आहे. ज्योतिरादित्य शिंदे हे 16 एप्रिल रोजी ग्वाल्हेरमध्ये आंबेडकर महाकुंभमध्ये सहभागी झाले होते. शिंदे यांनी स्वतः याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.
त्यांनी ट्विट करुन सांगितले की, कोविड-19 च्या तपासणीत माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्या सर्वांनी खबरदारी घ्यावी. जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन स्वतःची चाचणी करुन घ्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.