केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे फडणवीस यांना पत्र

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे फडणवीस यांना पत्र

नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे कोराडी वीज केंद्रात 660 मेगावॅटचे दोन नवे युनिट उभारण्याला विरोध होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कल्पना नळसकर - असूर, नागपूर

नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे कोराडी वीज केंद्रात 660 मेगावॅटचे दोन नवे युनिट उभारण्याला विरोध होत असताना आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे युनिट पारशिवणी तालुक्यात उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. गडकरी यांनी या संदर्भात ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. त्यामुळे पारशिवणी परिसरात रोजगाराची संधी निर्माण होईल तसेच कोराडी परिसरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल असेही गडकरी यांनी या पत्रात नमूद केले आहे.

महानिर्मितीचे कोराडी येथे दोन नवे युनिट उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे 29 मे रोजी प्रदूषण नियंत्रक मंडळातर्फे या संदर्भात सुनावणी घेतली जाईल. पर्यावरण प्रेमींनी याला तीव्र विरोध केला असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत आपली बाजू मांडली आहे. याची दखल घेत गडकरी यांनी फडणवीस यांना पत्र लिहून संबंधित बाबीकडे लक्ष वेधले आहे ..केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रात म्हटले आहे की विदर्भ कनेक्ट चे सचिव दिनेश नायडू यांनी वीज प्रकल्पाचा विस्तार करण्यास विरोध केला आहे. सध्या येथील वीज प्रकल्पाची क्षमता २६०० मेगावॅट आहे नव्या युनिट मे आणखी 1320 मेगाव्याची भर पडेल. शहरातील पर्यावरण प्रेमी व स्वयंसेवी संस्थांनी याला विरोध केला आहे. या सर्व संघटना प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या जनं सुनावणीतही विरोध नोंदवणार आहेत. या संघटनाचे म्हणणे आहेत की कोराडी सोबतच खापरखेडा केंद्राचे उत्पादन क्षमता उच्चांकावर पोचली आहे. आणखी दोन नवे युनिट सुरू केल्याचे प्रदूषण वाढत होईल. त्यामुळे पारशिवणी येथे युनिट स्थापन करण्यात विचार होऊ शकतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com