Firing In Pune : शिवसेनेच्या युवासेना जिल्हाप्रमुखांच्या कारवर गोळीबार; राजकीय वर्तुळात खळबळ

Firing In Pune : शिवसेनेच्या युवासेना जिल्हाप्रमुखांच्या कारवर गोळीबार; राजकीय वर्तुळात खळबळ

पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. शिंदे गटाच्या शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हा प्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या कारवर अज्ञातांनी थेट गोळीबार केला. ही घटना वारजे माळवाडीत रविवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घारे हे गणपती माथा परिसरातील आपल्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत उपस्थित होते. त्याचदरम्यान कार्यालयाबाहेर उभी असलेली त्यांची काळ्या रंगाची कार अज्ञात दुचाकीस्वारांनी लक्ष्य करत गोळ्या झाडल्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. या गोळीबारामुळे स्थानिक तसेच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

निलेश राजेंद्र घारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख आहेत. त्यांचे राजकीय कार्यक्षेत्र मुख्यतः पुणे शहर आणि परिसरात आहे. ते पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयातून कार्यकर्त्यांशी नियमित संवाद साधत असतात. दरम्यान, पुण्यात लागोपाठ गोळीबाराच्या घटना घडत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com