दारू पाजून मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार, व्हिडिओ केला व्हायरल
Admin

दारू पाजून मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार, व्हिडिओ केला व्हायरल

अमरावती येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.

सूरज दहाट, अमरावती

अमरावती येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २७ वर्षीय तरूणाने १९ वर्षीय तरूण मित्राला दारू पाजून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील बाभळी परिसरात घडली. तेथे उपस्थित तिसऱ्याने त्या अनैसर्गिक शरीरसंबंधाचे छायाचित्रण केले.

कळस म्हणजे तो व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल देखील करण्यात आला. त्या व्हायरल व्हिडिओची दखल घेत दर्यापूर पोलिसांनी दोघा युवका विरुद्ध गुन्हा दाखल केला.एकाने अत्याचाराचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण केले.व व्हॉट्सॲपवर शेअर केले.

अन् पाहता पाहता शेकडो लोकांकडे तो व्हिडिओ फॉरवर्ड झाला,बलात्काराच्या अनेक घटना होत असताना मित्रानेच मित्रावर केलेल्या अत्याचाराच्या या धक्कादायक घटनेची चर्चा संपुर्ण दर्यापुरात होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com