साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

महाबळेश्वरमध्ये सध्या ढगफुटीसदृश्य पाऊस सुरू झाला आहे.

महाबळेश्वरमध्ये सध्या ढगफुटीसदृश्य पाऊस सुरू झाला आहे. तुफान वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्यां पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर एकीकडेअचानक आलेल्या पावसामुळे येणारे पर्यटकांची ताराबळ उडाली. महाबळेश्वरमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांना याचा मोठा फटका बसला आहे. जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे.

काही दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यात दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस ढगफुटीसदृश्य असल्याचं दिसून येतं आहे. अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे काही पर्यटक खूश झाले तर काही नाराज झाले आहेत.

वीजेच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे शहराचा वीज पुरवठा खंडित झाला होता. तर मोबाईलचे नेटवर्क ही बंद झाले होते. यामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची अधिक तारांबळ उडाली. बाजारपेठ परिसरातील रस्ते, नाले पाण्याने ओसंडून वाहू लागले होते. तसेच मे महिना सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्यामुळे महाबळेश्वरात पर्यटकाची गर्दी होती. काही पर्यटकांनी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com