बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी थंडी पडली आहे तर काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली.

बुलढाणा जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली. यामुळं शेतकरी चिंतेत सापडले आहेत. कारण हाती आलेली पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पावसाचा तूर पिकासह गहू, हरबरा आणि कांदा पिकांना मोठं फटका बसण्याची शक्यता आहे.

या पावसाचा पिकांवर परिणाम होत आहे. ढगाळ हवामानाचा जिल्ह्यातील तूर आणि पालेभाज्यांना पिकांना मोठा फटका बसला आहे. ढगाळ वातावरणामुळं तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अवकाळी रिमझिम पावसाच्या हजेरीने पालेभाजी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com