UP Crime : पतीला दिलं चहामधून उंदीर मारण्याचं औषध, गळफास घेतल्याचा केला बनाव; अखेर पोलिसांनी केली अटक

UP Crime : पतीला दिलं चहामधून उंदीर मारण्याचं औषध, गळफास घेतल्याचा केला बनाव; अखेर पोलिसांनी केली अटक

फतेहगंज पश्चिम भागात एका विवाहित महिलेनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं स्वतःच्या पतीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

मेरठनंतर आता बरेलीमध्येही एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पती-पत्नीमधील वाद विकोपाला जाऊन थेट खूनात रूपांतरित झाला. फतेहगंज पश्चिम भागात एका विवाहित महिलेनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं स्वतःच्या पतीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या महिलेनं चहामध्ये उंदीर मारण्याचं विष मिसळून पतीला विषबाधा केली आणि नंतर त्याचा मृतदेह दोरीने लटकावून आत्महत्येचं नाट्य रचल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

दरवाजा बंद, खोलीत लटकलेला मृतदेह आणि पत्नीचा आक्रोश...

35 वर्षीय केहर सिंह याचा मृतदेह बंद खोलीत छताला दोरीने लटकलेला आढळला. पत्नीने केलेल्या आक्रोशानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढला. सुरुवातीला हे आत्महत्येचं प्रकरण वाटलं, मात्र मृताच्या भावाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनं संपूर्ण प्रकरणाचा वेगळाच रंग दिसून आला.

प्रियकरासोबत कट रचून पतीचा खून?

पोलीस तपासात समोर आलं की, केहरची पत्नी तिच्या प्रियकर पिंटूसोबत गैरसंबंधात होती. पिंटू हा बुलंदशहरचा रहिवासी असून, तिच्यासोबतच एका मेडिकल कॉलेजमध्ये काम करत होता. स्थानिकांच्या सांगण्यानुसार, तो अनेकदा त्यांच्या घरी येत असे आणि स्वयंपाकघरातही पत्नीसोबत वेळ घालवत असे. या नात्याचा विरोध केहर करत होता, ज्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते.

पोस्टमॉर्टम रिपोर्टने केला पर्दाफाश

केहरच्या मृत्यूनंतर करण्यात आलेल्या पोस्टमॉर्टम अहवालात गळा दाबल्याचे स्पष्ट निशाण आढळले आहेत. यामुळे आत्महत्येच्या संशयास पूणविराम लागला. पोलिसांनी तपासाचा मोठा धागा पकडत पत्नी आणि तिचा प्रियकर पिंटूला अटक केली. चौकशीत पत्नीने कबुली दिली की, तिने चहामध्ये उंदीर मारण्याचं औषध टाकून पतीला विषबाधा केली होती.

पोलिसांनी दोघांनाही अटक करून अधिक चौकशी सुरू केली आहे. एसपी मुकेश चंद्र मिश्रा यांनी सांगितले की, "हा एक पूर्वनियोजित कट असल्याचा आमचा प्राथमिक संशय आहे. आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी आत्महत्येचं रूप दिलं. मात्र पोस्टमॉर्टम आणि कुटुंबियांच्या निवेदनातून खऱ्या घटनेचा पर्दाफाश झाला आहे."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com