Delhi Blast : दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणी अपडेट समोर; 2019 पासून सोशल मीडियावर डॉक्टरांचं ब्रेनवॉश?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Delhi Blast ) नवी दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 जवळ पार्किंगमध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर अनेक गाड्यांना आग लागली. हा स्फोट एवढा मोठा होता की, आजूबाजूच्या दुकानांच्या काचाही फुटल्या.
या स्फोटात सुमारे 8 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक जखमी झाले. लाल किल्ला परिसरात मेट्रोच्या गेट क्रमांक एकवर एक कार उभी होती. याच कारमध्ये हा स्फोट झालेला आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या तीन गाड्यांना आग लागल्याची घटना घडली. या प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे.
2019 पासून सोशल मीडियावर डॉक्टरांचं ब्रेनवॉश केलं जात असल्याची माहिती मिळत आहे. व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युल तपासात हा मोठा खुलासा झाला आहे. दहशतवादी हल्ले करण्यासाठी आईडी कशी बनवायची, हे शिकण्यासाठीही सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणी अपडेट समोर
2019 पासून सोशल मीडियावर डॉक्टरांचं ब्रेनवॉश
व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युल तपासात मोठा खुलासा
