Shrikant Shinde In Loksabha
Shrikant Shinde In Loksabha

लोकसभेत श्रीकांत शिंदे यांच्या भाषणावेळी गदारोळ

लोकसभेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भाषणावेळी जोरदार गदारोळ झाला आहे. इंदिरा गांधी संविधान विरोधी होत्या का असा सवाल राहुल गांधींना विचारला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सलग दोन दिवस संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संविधानावर चर्चा सुरू आहे. आज शनिवारी लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांनी संविधानावर बोलत असताना भाजपा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. तर सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

आज लोकसभेच्या कामकाजादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेला विजय हा संविधानाची ताकद आहे. तसेच विरोधक महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्षनेता देण्यास असमर्थ ठरल्याचं त्यांनी सांगितलं.

लोकसभेत श्रीकांत शिंदे यांच्या भाषणावेळी जोरदार गदारोळ पाहायला मिळत आहे. संविधान चर्चेदरम्यान गदारोळ झाला. इंदिरा गांधी संविधान विरोधी होत्या का असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधी यांना विचारला आहे. श्रीकांत शिंदे यांच्या सवालावरून विरोधक चांगलेच संतापले आहेत. संविधानामुळेच एक चहावाला पंतप्रधान झाला तर एक सामान्य रिक्षावाला शिवसैनिक मुख्यमंत्री झाल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा-

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com