येवदा येथील ग्रामसभेत गदारोळ; सरपंच सचिव चोर असल्याच्या घोषणांनी दणाणले सभागृह

येवदा येथील ग्रामसभेत गदारोळ; सरपंच सचिव चोर असल्याच्या घोषणांनी दणाणले सभागृह

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि वादग्रस्त असलेली म्हणून ओळखला जाणाऱ्या येवदा येथे आज बरखास्त झालेली ग्रामसभा बोलावण्यात आली होती.

सुरज दाहाट |अमरावती : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि वादग्रस्त असलेली म्हणून ओळखला जाणाऱ्या येवदा येथे आज बरखास्त झालेली ग्रामसभा बोलावण्यात आली होती. सभेच्या अध्यक्ष स्थानी सरपंच प्रतिभा माकोडे ह्या होत्या तर सचिव राजेश कीटूकले सुटीवर गेल्याने सभेचे कामकाज ग्रामविस्तार अधिकारी अनुप कुलकर्णी व ग्रामविकास अधिकारी अरुण रायबोले यांनी सांभाळले. परंतु ग्रामसभेकरिता असलेले प्रोसिडिंग रजिस्टर गायब असल्याने सरपंच व सचिव यांनी ते गहाळ केल्याचा आरोप उपस्थित सदस्य व ग्रामस्थांनी करीत सरपंच व सचिव चोर असल्याच्या घोषणा देत सभागृह दणाणून सोडले आहे.

प्रोसिडिंग राजिस्टरच नसल्याने ग्रामसभेने घ्यावयाचे कामे कुठे घ्यावी असा सवाल उपस्थित नागरिकांनी केला. उपस्थित ग्रामविस्तार अधिकारी अनुप कुलकर्णी यांनी प्रोसिडिंग राजिस्टर ग्रामपंचयातला उपस्थित नाही असे ग्रामसभेला सांगितले व त्या बाबत ठराव घेण्यात आला व ही सभा स्थगित करण्यात आली. पुढील ग्रामसभा ही प्रोसेडिंग रजिस्टर उपलबध्द झाल्यावर घेण्यात येईल असे सांगितले त्यामुळे संतप्त गावकरी, ग्रामपंचायत सदस्य व प्रहारचे प्रदीप वडतकर यांनी नागरिकांच्या उपस्थितीत ग्रामपंचयातला कुलूप ठोकले.

त्यांनतर ग्रामपंचायत उपसरपंच मुजम्मील जमादार, सदस्य सुयोग टोबरे, राजेश गणोरकर, रंजित सोळंके अमानु उल्ला खा व प्रहारचे प्रदीप वडतकर व असंख्य कार्यकर्ते व तसेच नागरिक श्याम ठाकरे, संतोष तिडके, पंकज कैकाडी, ओमप्रकाश शर्मा, प्रदीप काळंके, राजेश मानकर, श्याम भालतडक, विठ्ठल डहाके विलास कैसर व बहुसंख्य नागरिकांनी येवदा पोलिसठाणे गाठून सरपंच व सचिव यांनी प्रोसिडिंग चोरल्याचा तक्रार अर्ज ठाणेदार आशिष चेचरे यांना दिला. ग्रामसभेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

येवदा येथील ग्रामसभेत गदारोळ; सरपंच सचिव चोर असल्याच्या घोषणांनी दणाणले सभागृह
उद्या होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटचे उद्घाटन
Lokshahi Marathi
www.lokshahi.com